📲 Install App

Watch this video to install the app on your mobile.

About MySchool

इवलेसे रोप लावीयले द्वारी तयाचा वेलू गेला गगनावरी… मोगरा फुलला मोगरा फुलला… फुले वेचिताशी बहरू कळी याशी आला!

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या या रचनेप्रमाणे पराशर ऋषींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या श्री पारेश्वर महाराजांच्या पवित्र भूमीत, पालखेड व परिसरातील गोरगरिबांच्या लेकरांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी 15 डिसेंबर 1980 रोजी एक छोटासा प्रयत्न केला गेला. कै. दादामियाँ शेख, कै. बाबुराव पाटील जाधव, कै. मुरलीधर पाटील शेळके, कै. भाऊसाहेब खरात, कै. दत्तोपंत भेंडे, श्री. अंबादास पाटील शेळके, श्री. विजय दौलतराव कुमावत, कै. एकनाथराव धनाड, कै. भिवसेन त्रिभुवन, कै. बाजीराव खांडेकर, डॉ. सखाराम राऊत या सर्व मान्यवरांनी श्री पारेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली.

या संस्थेअंतर्गत पालखेड गावात श्री पारेश्वर विद्यालयाचं एक छोटंसं रोपटं लावलं. बघता बघता या रोपट्याचं एका वटवृक्षात रूपांतर झालं. सुरुवातीच्या काळात संस्थेची धुरा कै. दादामियाँ शेख व कै. बाबुराव पाटील जाधव यांनी समर्थपणे पेलली. त्यानंतर 1985 ते 2014 या जवळजवळ 30 वर्षांच्या काळात कै. मुरलीधर भगवंतराव पाटील शेळके यांनी आपल्या अध्यक्षपदाच्या कारकिर्दीत शाळेचा चेहरामोहरा बदलून टाकला.

या शाळेतून ग.म.भ.न. चे धडे गिरवून आजवर सुमारे पाच हजार विद्यार्थी बाहेर पडले असून अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात लौकिक मिळवला आहे. आज इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंत सुमारे पाचशे विद्यार्थी विद्यालयातून शिक्षण घेत आहेत.

सध्या श्री. रामचंद्र मुरलीधर पाटील शेळके (अध्यक्ष) व श्री. विजय दौलतराव कुमावत (सचिव) यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली शाळेची उत्तुंग वाटचाल सुरू आहे. त्यांच्या दूरदर्शी दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण, पिण्यासाठी RO पाणी, CCTV सुरक्षा, हिरवाईने नटलेला परिसर अशा उत्तम सुविधा दिल्या आहेत. लवकरच स्मार्टबोर्ड व ई-लर्निंगची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

अनेक माजी विद्यार्थी व सामाजिक संस्थांनी विद्यालयासाठी भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मौल्यवान आर्थिक योगदान दिले आहे. विद्यालयात येणाऱ्या प्रत्येक माजी विद्यार्थी, पालक, नागरिक यांचा यथोचित सन्मान केला जातो. विद्यार्थिनींना निर्भय आणि पोषक वातावरणात शिक्षण घेता येते.

सर्व संचालक मंडळ, ग्रामस्थ, पालक, माजी विद्यार्थी, ग्रामपंचायत प्रशासन पालखेड, मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या सहकार्याने विद्यालयाची प्रगती नेत्रदीपकपणे सुरू आहे.

विद्यालयाच्या यशात व प्रगतीत हातभार लावणाऱ्या सर्व ज्ञात-अज्ञात हितचिंतकांचे मनःपूर्वक आभार.

Contact Us Donate Events Gallery Admissions Faculty Our Team Notices Success Stories
📱 Install App Guide ×
Watch this video to install our website as an app.