📲 Install App

Watch this video to install the app on your mobile.

Welcome to Our School

Empowering students for a brighter future through quality education.

No current notices.

Upcoming Events

No upcoming events found.

Message from the Chairman

श्री पारेश्वर भगवान यांच्या पावन भूमीत आपल्या श्री पारेश्वर शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना जिल्हा परिषद शाळेचे माध्यमिक शाळेचे वर्ग स्थानिक स्तरावर संस्था स्थापन करून परिसरातील गरजू गोर गरीब कष्टकरी वर्गाचे मुले इथे शिक्षण घेऊन आपला शिक्षणाचा पाया भक्कम करतील या उद्देशाने आमचे वडील कै.मुरलीधर पाटील शेळके व गावातील जानकार मंडळींनी या संस्थेची स्थापना केली.

शिक्षण हा मानवाचा खरा उध्दार करणारे साधन आहे पण त्याला आपण गांभीर्याने समजून घेऊन या साधनाचा वापर केला पाहिजे.आज पैसे किती असले तरी शिक्षण नसेल तर आपण जीवन जगत असताना त्या पैशाचा पाहुणे तितका योग्य वापर करून जीवन यशस्वी समाधानी जगू शकत नाही.आपल्या परिसरातील होतकरू मुले पुढे येणारे आव्हान पेलू शकतील यासाठी त्यांचा पाया भक्कम होण्यासाठी शालेय शिक्षण खूप महत्वाचे आहे. श्री पारेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ यासाठी कटिबद्ध आहे.

Read more

- श्री. रामचंद्र मुरलीधर पा. शेळके,
अध्यक्ष,
श्री पारेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ , पालखेड

Message from the Principal

श्री पारेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पालखेड या शाळेचा मुख्याध्यापक म्हणून मला दरवेळी शाळेच्या प्रवेशद्वारातून आत येताना एक विलक्षण अभिमानाची जाणीव होते. शाळा ही केवळ वर्गखोल्या, फळा-खडू आणि पुस्तकांची जागा नाही, तर ती अशी भूमी आहे जिथे मुलांचे स्वप्ने फुलतात, त्यांचे व्यक्तिमत्त्व घडते आणि भविष्य उज्ज्वल बनते.

दर सकाळी मुलांचे हसरे चेहरे आणि उत्साही पावले पाहून माझ्या मनात नवा उत्साह संचारतो. प्रत्येक विद्यार्थी आपल्याबरोबर एक वेगळा गुण, एक वेगळी ताकद घेऊन येतो. त्यांना योग्य दिशा दाखवणे, त्यांचा आत्मविश्वास वाढवणे हे आमचे सर्वांत महत्त्वाचे कर्तव्य आहे.

आमच्या शाळेत आम्ही ठामपणे मानतो की, खरी शिक्षणप्रक्रिया केवळ पाठ्यपुस्तकांपुरती मर्यादित नाही. होय, शैक्षणिक यश महत्त्वाचे आहे! पण त्याचबरोबर प्रामाणिकपणा, जबाबदारी, कर्तव्यनिष्ठा आणि करुणा यांसारख्या जीवनमूल्यांचा संस्कार करणे ही आमची ध्येयवेड आहे. कारण आजच्या बदलत्या जगात फक्त बुद्धिमत्ता पुरेशी नाही, तर सद्गुणी वृत्ती आणि मजबूत व्यक्तिमत्त्वही तेवढेच आवश्यक आहे.

या कार्यात माझे शिक्षकवर्ग हे माझे खरे आधारस्तंभ आहेत. त्यांचे कष्ट, समर्पण आणि प्रेम यामुळेच विद्यार्थी घडत आहेत. तसेच, आपल्या मुलांच्या भविष्यासाठी आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या पालकांचेही मी मनःपूर्वक आभार मानतो.

आगामी काळात माझी दृष्टी स्पष्ट आहे; आमची शाळा ही अशी जागा व्हावी जिथे प्रत्येक मूल सुरक्षिततेत, आत्मविश्वासाने आणि प्रेरणेने आपली वाटचाल करू शकेल. अभ्यास, क्रीडा, कला किंवा समाजसेवा कोणत्याही क्षेत्रातून प्रत्येक विद्यार्थ्याने आपली ताकद ओळखावी आणि समाजासाठी उपयोगी ठरावे, हीच माझी इच्छा आहे.

माझ्यासाठी आमची शाळा ही फक्त एक संस्था नाही; तर ती एक कुटुंब आहे, जी समान स्वप्नांनी आणि उज्ज्वल भविष्यासाठीच्या बांधिलकीने जोडलेली आहे. आपण सर्वजण मिळून शिकत राहू, वाढत राहू आणि प्रगती करत राहू.

Read more

अभिमान आणि कृतज्ञतेसह,
श्री.गुंजाळ संजू ओंकार
मुख्याध्यापक,
श्री पारेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, पालखेड

Message from the Secretary

आपली संस्था ही मूलभूत शिक्षण या तत्वावर भर देऊन ग्रामीण भागातील मुलांना अधिक सक्षम बनविणे यासाठी कटिबद्ध आहे. म्हणून तर वैजापूर तालुक्यात श्री पारेश्वर विद्यालय विविध क्षेत्रात अधिक गुणवंत विद्यार्थी देत आले आहे मग त्यात शिक्षण असो की खेळ की कला यात शाळेने आपली छाप सोडली आहे.

तसेच इथून पुढील शिक्षणासाठी गेलेले विद्यार्थी हे त्या त्या व्यावसायिक व पारंपरिक शिक्षण क्षेत्रात आपला ठसा उमटवत आहेत.श्री पारेश्वर भगवान यांचा कृपा प्रसादात हे रोपटे पुढे येणाऱ्या काळात वटवृक्ष होईल व ते करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.संस्था सचिव या नात्याने मी पुढील काळासाठी यावर अधिक भक्कमपणे काम करणार आहोत असा विश्वास मी व्यक्त करतो. पुढील भविष्यात येथे विविध उपक्रमशील शिक्षण देण्याचा प्रयत्न आम्ही करू ज्यातून रोजगाराभिमुख विद्यार्थी घडविणे हा उद्देश संस्थेचा पूर्ण होईल.

Read more

— श्री.विजय दौलतराव कुमावत
सचिव,
श्री पारेश्वर शिक्षण प्रसारक मंडळ, पालखेड

Our Stats

विध्यार्थी संख्या

5000+

शिक्षकांची संख्या

30+

वर्ग

माध्यमिक विद्यालय: इ. ५ वी ते १० वी (सेमी)

कनिष्ठ विद्यालय: इ. ११ वी व १२ वी (कला)

पुरस्कार

माझी शाळा सुंदर शाळा
तालुकास्तरीय तृतीय क्रमांक

Meet Our Team

View All Team Members

Our Videos

बालविवाह प्रतिबंध शपथ
बालविवाह प्रतिबंध शपथ
Watch on YouTube

Give Your Feedback

What Our Alumni Say

No feedback available yet.

🌐 Connect With Us On Social Media

Facebook Instagram @LinkedIn YouTube Chat on WhatsApp @YourTelegram @Twitter/X @github @Pinterest

Contact Us

Have any questions? Get in touch with us!

Contact Us
📱 Install App Guide ×
Watch this video to install our website as an app.